Trending News

107 एकर Adiwasi Land विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

1 Mins read

107 एकर आदिवासी जमीन विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

* चेतना इलपाते, नरसी मोनजी ट्रस्टसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

* एकच जमीन अनेकांना विक्रीचे आमिष, कोट्यवधींची फसवणूक उघड

उन्मेष गुजराथी
स्प्राउट्स Exclusive

खोटे आदिवासी दाखले, आधार कार्ड आणि जमिनीचे दस्तावेज बनवून सुमारे १०७ एकर आदिवासींच्या जमिनींची परस्पर विक्री करण्याऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश नवी मुंबईत नुकताच झाला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या टीमला मिळालेली आहे.

स्वतः आदिवासी असल्याचे भासवून adiwasi land बळकावून त्या विक्री करणाऱ्या चेतना ईलपाते व तिचे सहकारी अमर खुराणा, जीतेन्द्र पुरी, तसेच शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असणाऱ्या नरसी मोनजी ट्रस्ट (Narsee Monjee Institute of Management Studies -NMIMS) व त्याचे पदाधिकारी शैलेश गाजीवाला (Shailesh Gajiwala), हितेन शहा (Hiten Shah) व अशोक मुंढे (Ashok Mundhe) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रमसिंह पाटणकर यांच्या विक्रमेश इस्टेट एलएलपी कंपनीने केलेल्या एफआयआर मधील नोंदीनुसार असे स्पष्ट होते की, निंबोडे (ता. खालापूर ) येथील १०७ एकर जमीन ही मूळ adiwasi land आहे. ती जमीन विक्री करण्यासाठी सानपाडा येथील विक्रमेश इस्टेट एलएलपीसोबत चेतना इलपाते व त्यांचे सहकारी अमर खुराणा व जितेंद्र पुरी यांनी करार केला होता. तसेच दोन कोटी रुपयांची ऍडव्हान्स रक्कम सुद्धा घेतली होती. adiwasi land हस्तांतरित करून देण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकती, जमिनीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे चेतना इलपाते यांनी आधीच आश्वासन दिले होते.

खरेदीस टाळाटाळ
पण खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत फक्त पैशाची मागणी त्या करत होत्या. त्याची टाळाटाळ लक्षात आल्यानंतर कंपनीने खरेदीखतासाठी आग्रह धरला. तसेच त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली. तेव्हा आपल्यावर कारवाई होऊन adiwasi land परत मूळ मालकांना परत जाण्याच्या भीतीने चेतना इलपाते यांनी ही जमीन नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट एज्युकेशन ट्रस्ट यांना विक्री केल्याचे भासवण्याचे नवे कारस्थान रचले. या कटात ट्रस्टचे पदाधिकारी सुद्धा सहभागी झाले.

Also Read – Rise and fall of Rashid Naseem

ट्रस्टच्या खरेदी व्यवहाराला हरकत
ट्रस्टने खरेदीसाठी दिलेल्या वृत्तपत्र जाहिरातीवरून विक्रमेश इस्टेट कंपनीतर्फे हरकत नोंद केली होती. तसेच ट्रस्टला आपल्या व्यवहाराची कल्पना सुद्धा कंपनीने दस्त्वेजासह करून दिली होती. पण हरकत डावलून ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी चेतना इलपाते व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत १२/४/२०२४ व १०-७-२०२४ रोजी खरेदी करार पूर्ण केले. असा व्यवहार करून जमीन खरेदी केल्याचे भासवले आहे.

अनेकांची फसवणुक
चेतना Chetna Ilpate) आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या दस्तावेजांची पडताळणी कंपनीने केली असता त्यांनी बनावट दस्तावेज बनवून अनेक लोकांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकिस आले. एकच जमीन अनेकांना विकण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे उघडकीस आले. त्यामुळे विक्रमेश इस्टेट एलएलपीचे संस्थापक विक्रमसिंह पाटणकर यांनी खालापूर पोलिसात चेतना इलपाते तिचे सहकारी, तसेच नरसी मोनजी ट्रस्टचे पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याबाबत प्रतिक्रियेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश पटेल अमरीश पटेल (Amrish Patel) व संचालक बुरझिन भथेना (Burzeen Bhathena) यांना वारंवार संपर्क साधला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अनेक प्रकरणांचा उलगडा होणार
या रॅकेटने केलेल्या फसवणुकीच्या अनेक घटना आता उघडकीस येत आहेत. अद्याप अनेक प्रकरणांचा उलगडा व्हायचा आहे. पोलिसांची तपासचक्रे त्या दिशेने सुरू केली आहेत.

अन्य शहरांतही तक्रारी
गेल्याच आठवड्यात नवी मुंबईतील एका बिल्डरला दोन कोटी रुपयांना फसवल्याबाबत चेतना ईलपाते व त्यांचे सहकाऱ्यांवर एक गुन्हा दाखल झाला आहे. चेतना यांनी खोटे आदिवासी प्रमाणपत्रे धारण केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. अन्य शहरातसुद्धा त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल होत आहेत. कलकत्तामध्ये सुद्धा एक असाच गुन्हा दाखल झाल्याचे स्प्राऊटच्या निदर्शनास आले आहे.

“ट्रस्टचे पदाधिकारीही रॅकेटमध्ये
आम्ही केलेल्या व्यवहाराची माहिती असूनसुद्धा नरसी मोनजी ट्रस्टचे पदाधिकारी चेतना इलपाते व त्यांच्या साथीदारांच्या कटकारस्थानात सहभागी झाले. खरेदीचे दस्तावेज बनवले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या अशा नामवंत संस्थेने जमिनी लाटण्याचा प्रकार गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याने निंदनीय आहे म्हणूनच ते कारवाईस पात्र आहेत.”

-विक्रमसिंह पाटणकर
संस्थापक, विक्रमेश इस्टेट एलएलपी

Unmesh Gujarathi
Editor in Chief
sproutsnews.com
epaper.sproutsnews.com
businessnews1.com
moneynews1.com
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
twitter.com/unmeshgujarathi
https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/
Contact No.: 9322 755098

Related posts
ExclusiveGeneralTrending News

Lalbaug Raja Mandal : अंबानींमुळे 'लालबागचा राजा मंडळा'वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

1 Mins read
@unmeshgujarathi @sproutsnews उन्मेष गुजराथी, स्प्राऊट्स Exclusive ‘लालबागचा राजा नवसाला पावतो’, अशी लाखो भाविकांची दिशाभूल करणारी जाहिरात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रसारमाध्यमांद्वारे…
CultureExclusiveTrending News

Jain Temple Razed : जैन मंदिरानंतर आता चर्चवरही फिरणार पालिकेचा बुलडोझर

1 Mins read
उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स न्यूज Exclusive मुंबईतील विलेपार्ले येथे जैन धर्मियांचे पार्श्वनाथाचे मंदिर होते. हे मंदिर सुमारे ९० वर्षे जुने होते. मात्र चंद्रशेखर…
ExclusiveMarketsTrending News

महाघोटाळेबाज Parag Shah यांच्यावरील कारवाईचे काय?

1 Mins read
.• पराग शाह यांच्यामुळे भाजप व संघ परिवाराची बदनामी उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स Exclusive भाजपचे महाघोटाळेबाज बिल्डर पराग शाह यांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याविषयी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *