Pure Politics

Edelweiss: जुलमी सावकाराचा कॉर्पोरेट पाश

1 Mins read

जुलमी सावकाराचा corporate पाश

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive

‘Edelweiss ARC’ ही फायनान्स पुरविणारी कंपनी आहे. ही कंपनी मोठ्या प्रमाणात फ्रॉड करत आहे, त्यांच्या या भ्रष्ट व्यवहारामुळेच कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली होती, असा आरोप आहे, या कंपनीचे लायसन्स त्वरित रद्द न केल्यास कॉर्पोरेट जगातील असंख्य व्यावसायिक आत्महत्या करण्याची शक्यता आहे, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (एसआयटी) मिळालेली आहे.

आपल्या कर्तृत्त्वाने, प्रतिभेने कलादिग्दर्शन क्षेत्रात आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारे, चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे नितिन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येला ‘Edelweiss ARC’ ही कंपनी कारणीभूत होती, असा आरोप खुद्द देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केला होता. या आरोपांच्या ऑडिओ क्लिप पुरावा म्हणून न्यायालयात सादरही करण्यात आलेल्या आहेत.

देसाई यांच्या आत्महत्येनंतर ही कंपनी चर्चेत आली. त्यानंतर अनेक व्यावसायिक हे या कंपनीच्या कचाट्यात सापडलेले आहेत, अशी विशेष माहिती ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे.

मुंबईतील दलजित कौर (Daljeet Kaur) या बिझनेस करतात. त्यांना घरासाठी कर्ज (home loan) हवे होते. हे कर्ज त्यांना ‘एडलवाईज ग्रुप’ (Edelweiss Group) या कंपनीच्या Nido Home Finance Limited formerly known as Edelwise Housing Finance Limited) ने दिले आहे. कर्ज देताना त्यांनी स्वतःची कागदपत्रे कंपनीकडे सबमिट केली. मात्र या कागदत्रांमध्ये परस्पर फेरबदल (forgery) केला, असा आरोप कौर यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.

अधिक वाचा : महाघोटाळेबाज पराग शाह यांच्यावरील कारवाईचे काय?

याहून महत्वाचा भाग म्हणजे लोन वितरित (disburse) करण्यापूर्वी ५ महिने अगोदर हप्ते (advance EMI) चालू केले. त्यावर कौर यांनी कंपनीकडे तक्रार केली, त्यावेळी त्यांना हे हप्ते adjust केले जातील, असे तोंडी सांगण्यात आले. मात्र त्यानंतर काहीही करण्यात आलेले नाही. याउलट कंपनीने त्यांची अधिक फसवणूक केली, असा आरोपही कौर यांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना केला आहे.

कौर यांची कंपनीने अनेक प्रकारे फसवणूक केली, त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले, त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार आले. तसा प्रयत्नही त्यांनी अनेकदा केला, मात्र सुदैवाने त्यांना यश आले नाही. याविषयी त्यांनी अनेकदा कंपनीशी पत्रव्यवहार केले, प्रत्यक्ष ऑफिसला भेटी दिल्या, मात्र कंपनीने त्यांनाच धमकी दिली. इतकेच नव्हे लोन दिल्यांनतर २ महिन्यांनी त्यांना NPA ( Non Performing Assets: अनुत्पादित कर्ज) ची नोटीस पाठवली.

कंपनीने छळ करण्यासाठी टाकल्या केसेस:

अखेरीस कौर यांनी सोशल मीडियावरही आवाज उठवला. तो आवाज दाबण्यासाठी कंपनीने अघोरी पाऊल उचलले. त्यांना मानहानीची (defamation suit) नोटीस बजावण्यात आली.

लोन दिल्यानंतर २ महिन्यांनी Edelweissने कौर यांच्यावर कोलकता (Kolkata) न्यायालयात केस दाखल केली. मात्र या कारस्थानालाही कौर बळी पडल्या नाही. अखेरीस कौर जिंकल्या. Edelweissपराभूत झाली. न्यायालयाने हे दावे फेटाळून (dismiss) लावले. मात्र इतके करूनही हा छळवाद संपला नाही. Edelweissने त्यांच्यावर अहमदाबाद (Ahmedabad ) येथील न्यायालयात दुसरी केस टाकलेली आहे.

RBI च्या अधिकाऱ्यांचा कानाडोळा
कौर यांनी याविरोधात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), कर्ज वसुली न्यायाधिकरण ( Debts Recovery Appellate Tribunals – DRAT) यांच्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. अशाच पद्धतीच्या तक्रारी (‘Edelweiss’ ने फसवलेल्या ) अनेक बिझनेसमन लोकांनी NCLT दाखल केलेल्या आहेत, अशी माहितीही ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेली आहे. याबाबत ‘स्प्राऊट्स’च्या प्रतिनिधीने ‘Edelweiss’ चे संचालक रसेश शहा (Rashesh Shah-chairman) यांना संपर्क साधला असता, तो होवू शकला नाही.

‘Edelweiss ARC’ कंपनी नेमकी काय आहे?

Edelweiss एआरसीचे एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (EARC) असे पूर्ण नाव आहे. ही कंपनी ‘Edelweiss ग्रुप’चा भाग किंवा एक शाखा आहे.

‘Edelweiss एआरसी’ ही एक वित्तीय साहाय्य करणारी कंपनी आहे. ग्राहकांना गरजेनुसार आर्थिक साहाय्य करते. ही कंपनी होम लोन्स, व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. तसेच मालमत्ता व्यवस्थापन (म्युच्युअल फंड आणि पर्यायी मालमत्ता), मालमत्ता पुनर्रचना, विमा या क्षेत्रातही काम करते.

Related posts
ExclusivePure Politics

Looting of Crores: काँग्रेसचा कथित नेता शिवजी सिंगकडून सर्वसामान्यांची कोट्यवधींची लुबाडणूक

1 Mins read
• ‘मिश्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चा रामधारी मिश्रा ‘नॉट रिचेबल’ अमित पवार काँग्रेस पक्षाचा कथित वरिष्ठ पदाधिकारी शिवजी प्रभुनारायण सिंग याने कित्येक सर्वसामान्य…
ExclusivePure Politics

मुंबई महानगर पालिकेच्या (BMC Waste) घनकचरा विभागालाही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची दुर्गंधी

1 Mins read
  उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स न्यूज Exclusive मुंबई महानगपालिकेच्या (BMC) घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) रंजन बागवे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५…
Pure Politics

Green Signal : विकास प्रकल्पांबाबत न्यायालयाची भूमिका सकारात्मक

1 Mins read
अॅड. रत्नेश मिश्रा Sprouts Legal Network देशातील वीज निमिर्तीच्या 15 टक्के वीजनिर्माण करणा-या आणि जवळपास 43254 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असणाऱ्या महाराष्ट्रात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *