ExclusivePure Politics

मुंबई महानगर पालिकेच्या (BMC Waste) घनकचरा विभागालाही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची दुर्गंधी

1 Mins read

मुंबई महानगर पालिकेच्या BMC घनकचरा विभागालाही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची दुर्गंधी

 

उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स न्यूज Exclusive

मुंबई महानगपालिकेच्या (BMC) घनकचरा विभागाचे सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) रंजन बागवे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ डिसेंबर २०२४ रोजी अटक केली होती. बागवे यांनी त्याच्या कारकिर्दीत अक्षरश: कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार केला, त्याच्या जागेवर संजय गवळी या अभियंत्याची नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे. गवळी हेही बागवे याच्या पाऊलावर पाऊल ठेवून कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा करत आहेत, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या हाती आलेली आहे.

महाभ्रष्ट बागवे याच्याप्रमाणेच गवळी हे देखील घनकचरा विभागाने केलेला खर्च केवळ कागदोपत्री दाखवत आहेत व त्या अनुषंगाने खोटी बिले काढली जात आहेत. त्यातून गवळी हे कोट्यवधी रुपयांचा मलिदा ओरपत आहेत. मात्र त्याचवेळी कष्ट करणारे वंचित, बहुजन समाजाचे कामगार हे मात्र बोनस, भविष्यनिर्वाह निधी (PF), HRA, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजना (ESIC) यांपासून वंचित रहात आहेत. या लाभांतून जवळपास १८ ते २० टक्के कमिशन हे पूर्वी बागवे कमवायचा. तेच ‘कलेक्शन’ आज गवळी करत आहेत.

या गैरव्यवहारांची त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही ‘स्प्राऊट्स’च्या टीमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केलेली आहे.

घनकचरा विभागाच्या कारभारात कोट्यवधींचे घोटाळे:

मुंबई महानगर पालिकेचा (Mumbai Muncipal Corporation- BMC) घनकचरा व्यवस्थापन विभाग (Solid Waste Management) हा अत्यंत महत्वाचा विभाग मानला जातो. मुंबईला स्वच्छ व रोगराईमुक्त ठेवण्यासाठी या विभागाचे मोठे महत्त्व आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही यासाठी ४,५३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. साधारणतः एका वार्डात प्रत्येक आर्थिक वर्षासाठी सुमारे १०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद करण्यात येते.

मुंबईकरांच्या घामाच्या टॅक्समधील पैशांतून या खर्चाची तरतूद करण्यात येते, मात्र पालिकेचा ई विभाग (E Ward, BMC) हा मात्र भ्रष्टाचाराचे कुराण बनलेला आहे. भ्रष्टाचारी बागवे हा तर केवळ घनकचरा विभागातून महिन्याला १० ते १५ लाख रुपयांचे कलेक्शन करायचा, इतर विभागातील कलेक्शन हेदेखील यापेक्षा कैक पटीने मोठे असायचे, असा त्याच्यावर वारंवार आरोप केला जात होता. मात्र बागवेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध होते, त्यामुळे तो वर्षानुवर्षे पकडला जात नव्हता.

अधिक वाचा : – Fake Bill Exposed

अखेर बागवे ACB च्या ट्रॅपमध्ये सापडला कसा ?

बागवे हा भ्रष्टाचार करण्यात तरबेज होता, त्यामुळे तो सहजासहजी सापडला जात नव्हता. मात्र अखेरीस तोही ACB च्या ट्रॅपमध्ये सापडला.
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि रे रोड रेल्वे स्थानकाजवळील मोक्याच्या ठिकाणी शौचालय प्रकल्पांसाठी कंत्राटदाराने अर्ज सादर केले होते. त्यासाठी ‘पे अँड यूज’ सुविधा पुरविणाऱ्या सर्व कंत्राटदारांना करारनामा बनविण्यासाठी नोटीस देण्यात आलेली होती.
बागवे याने कंत्राट पास करण्यासाठी नेहमीप्रमाणे कंत्राटदारांकडे प्रत्येकी तब्बल १० लाख रुपयांची लाच मागितली होती. यापैकी एका कंत्राटदाराकडून तडजोड होत ही रक्कम ६ लाख रुपये इतकी ठरली.

मुंबई महानगर पालिकेच्या BMC घनकचरा विभागालाही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराची दुर्गंधी

त्यापैकी ३ लाख रुपयांचा हप्ता घेताना अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या (ACB ) अधिकाऱ्यांनी बागवे याला रंगेहात पकडले.
बागवे याला पकडताच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या व त्याला आर्थर रोड येथील जेलमध्ये डांबण्यात आले, मात्र ही केस लूज करण्यात आली व कायद्याच्या पळवाटांचा आधार घेतला गेला, त्यामुळे महाभ्रष्ट बागवे अवघ्या ६ दिवसांत जामिनावर सुटला. काही दिवसांनी ‘तो पुन्हा पालिकेत रुजू होईल व पहिल्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करेल, अशी भीती पीडित तक्रारदार व कंत्राटदारांनी ‘स्प्राऊट्स’शी बोलताना व्यक्त केली.

काही वर्षांपूर्वी उल्हासनगर नगर पालिकेत स्टेनोग्राफर असणाऱ्या गणेश शिंपी यालाही लाच घेताना ACB च्या दत्ता कराळे यांनी पकडले होते. मात्र ते हिंमत हरले नाहीत, त्याच जिद्दीवर शिंपी आजमितीला पालिकेत सहाय्यक मुन्सिपल कमिशनर आहेत, हे खेदाने नमूद करावेसे वाटते.

Related posts
ExclusiveGeneralTrending News

Lalbaug Raja Mandal : अंबानींमुळे 'लालबागचा राजा मंडळा'वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

1 Mins read
@unmeshgujarathi @sproutsnews उन्मेष गुजराथी, स्प्राऊट्स Exclusive ‘लालबागचा राजा नवसाला पावतो’, अशी लाखो भाविकांची दिशाभूल करणारी जाहिरात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रसारमाध्यमांद्वारे…
ExclusivePure Politics

Looting of Crores: काँग्रेसचा कथित नेता शिवजी सिंगकडून सर्वसामान्यांची कोट्यवधींची लुबाडणूक

1 Mins read
• ‘मिश्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चा रामधारी मिश्रा ‘नॉट रिचेबल’ अमित पवार काँग्रेस पक्षाचा कथित वरिष्ठ पदाधिकारी शिवजी प्रभुनारायण सिंग याने कित्येक सर्वसामान्य…
CrimeExclusive

Murder : हत्येला आत्महत्या दाखविण्याचा प्रयत्न

1 Mins read
उन्मेष गुजराथी स्प्राऊट्स न्यूज Exclusive महिलेचा खून(Murder ) करून आत्महत्या दाखविण्याचा प्रकार मुंबईतील दारूखाना येथे घडला आहे, ‘स्प्राऊट्स’ या मुंबईतील दैनिकाने हा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *