उन्मेष गुजराथी
स्प्राऊट्स Exclusive
काही स्वयंसेवी संस्थांकडून ‘दादासाहेब फाळके’ यांच्या नावाने नकली पुरस्कार दिले जात आहेत. हे नकली पुरस्कार दर महिन्याला दिले जात आहेत, या नकली पुरस्कारांचे स्वरूप ‘सरकारी’ वाटावे, यासाठी एका संस्थेने तर चक्क भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी यांनाही बोगस फाळके पुरस्कार व बोगस डॉक्टरेट दिली. इतकेच नव्हे तर प्रल्हाद मोदी यांच्या हस्तेही बोगस डॉक्टरेट दिली आहेत, अशी माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हीस्टीगेशन टीमच्या हाती आली आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके (Dhundiraj Govind Phalke) उर्फ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या नावाने भारत सरकारतर्फे पुरस्कार दिला जातो. भारतीय चित्रपट सृष्टीत भरीव कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो, सध्या मात्र दादासाहेब फाळके व त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई फाळके (Saraswatibai Phalke) यांच्या नावाने १५ ते १६ संस्था धर्मदाय आयुक्तांकडे रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत. या संस्थांतर्फे दर महिन्याला फेक अवॉर्ड्स विकली जातात.
या नकली (fake) अवार्ड्सच्या ब्रोशरवर १ लाख रुपयांच्या आसपास अशी अवॉर्ड्सची किंमत लिहिलेली असते, प्रत्यक्षात हे नकली अवार्ड् साधारण: २ हजारांपासून चालू होतात. याहून गंभीर बाब म्हणजे या सोहळ्यात बोगस मानद डॉक्टरेट- पीएचडी (bogus honorary doctorate) देखील वाटण्यात येते.
या बेकायदेशीर कार्यक्रमाला कायदेशीर किंवा सरकारी स्वरूप यावे, यासाठी हा कार्यक्रम महाराष्ट्र सदन, मेयर हॉल, पत्रकार संघ अशा ठिकाणी घेण्यात येतात. विशेष म्हणजे पोलीस अधिकारी, रिटायर्ड जजेस, आमदार- खासदार- मंत्री यांनाही आमंत्रित केले जाते. बेकायदेशीर कार्यक्रमाला कायदेशीर स्वरूप यावे, यासाठी ही युक्ती करण्यात येते. याविषयीच्या असंख्य बातम्या ‘स्प्राऊट्स’ (Sprouts) या मुंबईतील इंग्रजी दैनिकाने प्रसिद्ध केलेल्या आहेत.
दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी मुंबईतील ‘सहारा स्टार’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये बोगस पीएचडी वाटण्याचा कार्यक्रम करण्यात आला. राजकुमार टाक (Rajkumar Tak) या फ्रॉड माणसाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता. त्याच्या संस्थेचे नाव होते ‘नेल्सन मंडेला नोबेल पीस अकॅडमी’. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Damodardas Modi) यांचे छोटे बंधू प्रल्हाद दामोदरदास मोदी (Prahlad Damodardas Modi) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
चित्रा पाटील, प्रशांत नाईक यांनीही घेतली बोगस डॉक्टरेट
प्रल्हाद मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रा आस्वाद पाटील ( Chitra Aswad Patil) यांना बोगस मानद डॉक्टरेट देण्यात आली. चित्रा आस्वाद पाटील या शेतकरी कामगार पक्षाच्या माजी दिवंगत राज्यमंत्री मीनाक्षी पाटील (Meenakshi Patil) यांच्या स्नुषा आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत. याशिवाय अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत मधुसूदन नाईक (Prashant Madhusudan Naik ) यांनीही बोगस पीएचडी(PHD) पदरात पाडून घेतली.
हेही वाचा : राजभवनातील आर्थिक घोटाळे आणि प्रशासनाचा खेळखंडोबा
या कार्यक्रमात शेकडो जणांना बोगस पीएचडी देण्यात आल्या.
अमेरिकेतील जेबीआर हार्वर्ड मान्यताप्राप्त आणि केम्ब्रिज स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशनशी संलग्न असणाऱ्या ‘सेंट मदर तेरेसा युनिव्हर्सिटी फॉर डिजिटल एज्युकेशन एक्सलन्स सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट’तर्फे या पीएचडी(PHD) देण्याचा दावा केला गेला. प्रत्यक्षात असे कोणतेही विद्यापीठ अस्तित्वात नाही.
या कार्यक्रमासाठी हॉटेल, केवळ १० रुपयाची डिजिटल प्रिंट असलेले प्रमाणपत्र, गाऊन (gown) व डोक्यावरची टोपी (convocation cap) इतकाच खर्च केला गेला. त्यासाठी या शेकडो बोगस पीएचडी ग्राहकांकडून लाखो रुपये वसूल केले गेले. यावेळी खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते याशिवाय Bu Abdullah (Dubai ) सारखी फ्रॉड माणसेही उपस्थित होती.
या कार्यक्रमाचे आयोजक राजकुमार टाक या फ्रॉड माणसाने केले होते. टाक याने याआधी ‘श्री. दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवॉर्ड फिल्म फौंडेशनतर्फे बोगस पीएचडी वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले होते. या बेकायदेशीर कार्यक्रमाला कायदेशीर स्वरूप प्राप्त व्हावे व कार्यक्रमाची उंची वाढावी म्हणून प्रल्हाद दामोदरदास मोदी यांना वारंवार बोलावले होते. यात त्यांनाही बोगस पीएचडी देण्यात आली व त्यानंतर त्यांच्या हस्ते बोगस पीएचडी वाटण्यात आल्या. या गैरकारभाराला ‘स्प्राऊट्स’ने वाचा फोडली व त्यानंतर अशा कार्यक्रमांना प्रल्हाद मोदी यायचे बंद झाले.
कल्याण जाना ( Kalyanji Jana) हा असाच टपोरी आयोजक आहे. याने ‘दादासाहेब फाळके’ यांच्या नावाने स्वयंसेवी संस्था NGO उघडलेली आहे. फाळके यांच्या नावाने हा बेकायदेशीर धंदे करीत असतो. फाळके यांच्या पुरस्काराच्या नावाने कार्यक्रम आयोजित करतो. त्याने George Washington University of Peace या नावाने बनावट प्रमाणपत्र तयार केलेली आहेत. प्रत्यक्षात असे कोणतेही विद्यापीठ अस्तित्वात नाही, मात्र या व इतर कथित विद्यापीठांच्या नावाने ग्राहकांची फसवणूक करणे, हाच या फ्रॉड माणसाचा धंदा आहे.
बोगस पीएचडी पदव्या विकणाऱ्या या फ्रॉड माणसांपासून सावध रहा. तुमची फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा:
विवेक चौधरी (Vivek Choudhari- ESRDS ) मोहम्मद सिद्धीकी (Sidic A. Muhammed – Gulf ), कल्याण जाना (Kalyanji Jana), Francisco Sardinha, तपन राऊतराय (Tapan Rautaray), पवन कुमार भूत (Pawan Kumar Bhoot), मधू क्रिशन (Madhu Krishan), घनश्याम सखाराम कोळंबे (Ghanshyam Kolambe), पीयूष पंडित (Peeyush Pandit),किरण बोंगाळे Kiran Bongale, Sangli),अभिषेक पांडे (Abhishek Pandey), महेंद्र शामकांत देशपांडे ( Mahendra Shamkant Deshpande, Nashik- Saputara- Gujarat ), लाल बहादूर राणा (Lalbahadur Rana), सुनिलसिंह परदेशी (Sunil Singh Pardeshi) मंगेश देशमुख (Mangesh Deshmukh), नरेशचंद्र काठोळे, अमरावती (Nareshchandra Kathole – Dr Panjabrao Deshmukh IAS Academy, Amravati), विश्वास आरोटे, पत्रकार (Vishwas Arote, reporter), सूर्यकांत राऊळ (Surykant Rawool), तरविंदर सिंह (Tarvinder Singh), अन्वर शेख (Anvar Shaikh- Pune),बू अब्दुल्ला (Bu Abdullah), लोकेश मुनी (Lokesh Muni), राजकुमार टाक ( Mansukh Damji Tank – Rajkumar Tank), विजय पाटील (Vijay Patil), Joshua Immanuel कविता बजाज Kavita Bajaj, गौरव शहा (Gaurav Shah- BJP) हे सर्वच जण फ्रॉड आहेत. त्यांनी देशविदेशात बोगस पीएचडी वाटण्याचा जणू सपाटाच लावलेला आहे. यापैकी काही जण केवळ पाचवी इयत्ता पास आहेत.
पवन कुमार भूत (Pawan Kumar Bhoot – Police Public Press- magazine ) हा असाच फ्रॉड माणूस आहे. हा दर महिन्याला बोगस मानद पीएचडी (honorary PhD) देण्याचा कार्यक्रम आयोजित करत असतो. या बोगस मानद डॉक्टरेट या American East Coast University तर्फे वाटण्यात येतात. जगाच्या पाठीवर हे कथित विद्यापीठ कुठेही अस्तित्वात नाही. नकली पीएचडी विकणाऱ्या या फ्रॉड माणसापासून जनतेने सावध रहावे, असे आवाहन ‘स्प्राऊट्स’तर्फे करण्यात येत आहे.
बोगस पीएचडी पदव्या देणाऱ्या बनावट विद्यापीठांची यादी
► Chicago Open University
► Gandhi Peace Foundation Nepal
► World Culture and Environment Protection Commission
► The George Washington University of Peace, United States of America
► American East Coast University
► Socrates Social Research University
► World Human Rights Protection Commission (WHPRC)
► World Peace of United Nations University
► Mount Elbert Central University
► Maryland State University
► The University of Macaria
► Theophany University
► The Open International University of Complementary Medicine, Sri Lanka
► University of America Hawaii and Inox International University
► World Mystic Science Institute (OPC) Private Limited
► University of South America
► Southwestern American University
► The American University, USA
► Zoroastrian University
► Vinayaka Missions Singhania
► American Heritage University of Southern California (AHUSC)
► Peace University
► Global Human Rights Trust (GHRT)
► Trinity World University, UK
► St Mother Teresa University
► American University of Global Peace
► Jeeva Theological Open University
► World Peace Institute of United Nations
► Global Human Peace University
► Bharat Virtual University for Peace and Education
► National Global Peace University
► Ballsbridge University
► International Open University of Humanity Health, Science and Peace, USA
► Harshal University
► International Internship University
► British National University of Queen Mary
► Jordan River University
► Boston Imperial University
► Dayspring Christian University
► South Western American University
► Global Triumph Virtual University
► Vikramshila Hindi Vidyapeeth
► Jnana Deepa University (Pune)
► Oxfaa University
► Mount Elbert Central University
► Maa Bhuvaneshwari International University
► The Institute of Entrepreneurship and Management Studies (IEMS)
► Ecole Superieure Robert de Sorbon
► Central Christian University
► Azteca University
► University of Swahili
► Chhatrapati Shivaji Maharaj Lok Vidyapith, Amravati
► International Human Rights Ambassador International Peace Corps Association
► Indo Global University, Hyderabad
► Mount Elbert Central University
► McSTEM Eduversity, USA
► Social Awareness and Peace University
► Indian School of Management and Studies
► Socrates Social Research University
► International Global Peace University
► Ballsbridge University
► Commonwealth of Dominica
► International Anti-corruption and Human Rights Council
► Bharat Virtual University
► Pandit Deendayal Upadhyay Hindi Vidyapith
► The George Washington University of Peace
► Asia Vedic Culture Research University
► Magic Book of Record
► European Digital University (EDU)
► Hessen International University
बनावट पुरस्कार आणि पदव्या देणाऱ्या स्वयंसेवी(NGO) संस्थांची यादी:
► Dadasaheb Phalke Icon Awards Film Organisation
► Shri Dadasaheb Phalke International Award Film Foundation
► World Human Protection Commission
► Mahatma Gandhi Global Peace Foundation
► Empower Social and Education Trust
► Nelson Mandela Nobel Award Academy
► Diplomatic Mission Global Peace
Unmesh Gujarathi
Editor in Chief
sproutsnews.com
epaper.sproutsnews.com
businessnews1.com
moneynews1.com
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
twitter.com/unmeshgujarathi
https://www.linkedin.com/in/unmesh-gujarathi-4125481a/
Contact No:9322 755098