Exclusive

पुरुषोत्तम चव्हाण प्रकरणातील ताजे आरोप – ईडी आणि ईओडब्ल्यू चौकशी अंतर्गत.

1 Mins read

माझा’च्या पत्रकारांची कोटीच्या कोटी उड्डाणे!

केंद्रीय तपास यंत्रणेकरून होणारी अटक टाळावी, म्हणून मुंबईतील भाजपच्या आमदाराने व दोन सिनिअर रिपोर्ट्सनी आरोपीला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स न्यूज’च्या हाती लागलेली आहे.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Economic Enforcement ) म्हणजेच ‘इडी’ने FIR दाखल केला होता. याप्रकरणी त्यांना अटक होणार होती, त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात होते. या प्रकरणाचा फायदा दोन रिपोर्टर्सने घेतला. हे दोन्ही रिपोर्टर्स सध्या महाराष्ट्रातील नावाजलेल्या व नावात ‘माझा’ (Majha) नाव असलेल्या मराठी न्यूज चॅनेलमध्ये कार्यरत आहेत. क्राईम बिट कव्हर करणाऱ्या या पत्रकारांनी चव्हाण यांची ओळख भारतीय जनता पक्षाच्या आमदाराशी (ज्याच्या आडनावात “लाड’ ही अक्षरे आहेत) करून दिली. या तिघांनी चव्हाण याना अटक होवू नये यासाठी तब्बल ३ कोटी रुपये रुपयांचा गंडा घातला, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यापैकी दीड कोटी रुपये हे आमदाराने स्वतःकडे ठेवले. तर उर्वरित दीड कोटी रुपये हे, ज्यांच्या नावात ‘सूरज’ आहे अशा या दोन पत्रकारांना दिले. मात्र ही अटक काही टळली नाही व चव्हाण अद्यापही जेलमध्येच आहेत.

मागील वर्षी ‘इडी’च्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घरावर धाड टाकली, त्यावेळी त्यांना चव्हाण यांची वैयक्तिक व महत्त्वाची डायरी सापडली. त्यात या आमदार व दोन ‘सूरज’ची नवे आढळली. ‘इडी’ने ही डायरी ‘आर्थिक गुन्हे शाखा’ म्हणजेच EOW कडे तपासासाठी सुपूर्त केलेली आहे. ही गोपनीय माहिती लवकरच सार्वजनिक करावी, व या आमदाराची हकालपट्टी व्हावी, व दोषींना तात्काळ शिक्षा व्हावी, अशी मागणी ‘स्प्राऊट्स न्यूज’चे संपादक उन्मेष पद्माकर गुजराथी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. उन्मेष गुजराथी हे लवकरच ‘माझा’च्या मालकांशी भेट घेवून, या दोन पत्रकारांच्या हकालपट्टीची मागणी करणार आहेत.

या प्रकरणाचा पूर्व इतिहास

पुरुषोत्तम चव्हाण ( Purushottam Prabhakar Chavan ) हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी करंदीकर यांचे पती आहेत. त्यांच्यावर अनेक गुंतागुंतीची आर्थिक आणि फसवणूक संबंधी गुन्हे दाखल झाले आहेत आणि ते अद्यापही न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.

‘स्प्राऊट्स न्यूज’च्या तपासामध्ये आढळलेल्या प्रमुख प्रकरणांत, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा (EOW) यांनी चव्हाण यांच्यावर ₹24.78 कोटींच्या मोठ्या फसवणुकीचा आरोप केला आहे, ज्यात त्यांनी १९ जणांना सरकारी कोटा‑जमिनी/ फ्लॅट सवलती यासाठी खोट्या आश्वासनाखाली भरपूर रक्कम घेतल्याचा समावेश आहे. त्यानुसार ते आणि त्यांचे सहकारी हे संशयास्पद दस्तऐवज, बनावट करारपत्रे आणि खोटे सरकारी आश्वासनं वापरून लोकांना फसवणूक करून हे पैसे मिळविण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप ईओडब्ल्यूने (EOW) केला आहे.

यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या फसवणुकीतही पुढील ₹7.42 कोटींचा ठगबाजार समोर आला आहे, ज्यात चव्हाण यांनी सवलतीच्या सरकारी भूखंड/ बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (BPT) जमीन मिळेल असे सांगून फसवणूक केली आहे, त्याची चौकशी चालू आहे.

या दोन्ही FIR आणि संबंधित घटकांवर आधारित, केंद्रीय तपास विभाग (ED) ने प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत ₹263 कोटींहून अधिक IT रिफंड घोटाळा प्रकरणात देखील चव्हाण यांना अटक केली होती. त्या प्रकरणातही ते न्यायालयीन कोठडीमध्ये होते.

त्यानंतर न्यायालयाने फेब्रुवारी २०२६ मध्ये त्यांच्या जमीन अर्जाला नकार दिला, या प्रकारात पुरावे आणि साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता हे लक्षात घेऊन, जमीन न मिळण्याचे कारण स्पष्ट केलेआहे.

ईओडब्ल्यू तपासात IPS अधिकारी रश्मी करंदीकर यांच्याशी आर्थिक व्यवहारांसंदर्भात चौकशी देखील झाली होती, विशेषतः त्यांच्या खात्यातून ₹2.64 करोड रुपये (पुरुषोत्तम चव्हाणकडून) जमा झाल्याबद्दल स्पष्टीकरण मागितले गेले होते; तरीही त्यांना आरोपी म्हणून नोंदलेलं नाही.

पुरुषोत्तम चव्हाण हे विविध सरकारी कोटा जमीन/फ्लॅट आणि आर्थिक फसवणूक प्रकरणांत मुख्य आरोपी असून त्यांच्यावर ₹30 कोटींच्याही अधिक फसवणुकीचे आरोप, तसेच ₹263 कोटींच्या आयकर‑फसवणूक प्रकरणातील ED तपास आहे; ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून जमीन अर्ज नाकारला गेला आहे.

Related posts
ExclusiveNews PointTrending News

BJP Protocol Secretary : कोट्यवधी रुपयांची फसवणूक

1 Mins read
भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रोटोकॉल विभागाच्या सचिवाने भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते व मंत्री यांच्याशी काही गुंतवणूकदारांची बैठक घडवून आणली. व त्यांचे…
ExclusiveNews PointPure Politics

BJP 420 Giri Allegations : मुंबई प्रोटोकॉल सेक्रेटरीची ४२० गिरी

1 Mins read
उन्मेष गुजराथी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी व मुंबई भाजपचा प्रोटोकॉल सेक्रेटरी…
ExclusivePure PoliticsTrending News

Food Scam : मुंबईत ३ कोटींचा अन्न घोटाळा, माजी नगरसेवकावर आरोप

1 Mins read
मुंबईत कोविड लॉकडाऊनच्या काळात, गरजू नागरिकांना अन्न पुरवठा करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार समाजसेविका पायल शहा यांनी दाखल केली आहे….

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *