ExclusiveNews PointTrending News

BJP Protocol Secretary : कोट्यवधी रुपयांची फसवणूक

1 Mins read

भारतीय जनता पार्टीच्या मुंबई येथील प्रोटोकॉल विभागाच्या सचिवाने भाजपचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते व मंत्री यांच्याशी काही गुंतवणूकदारांची बैठक घडवून आणली. व त्यांचे नाव वापरून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला, इतकेच नव्हे तर या प्रकरणाची वाच्यता केल्यास, जीवे ठार मारण्याची धमकीही दिली, अशी धक्कादायक माहिती ‘स्प्राऊट्स न्यूज’च्या हाती लागलेली आहे.

महाराष्ट्रातील पनवेल तालुक्यात आडिवली येथे १०० गुंठा जमीन (सर्व्हे नंबर १३७, १३८/ अ /२, १३८/ अ /१) आहे. या जमिनीची किंमत ७ करोड १० लाख रुपये होती. त्यासाठी मुंबई भाजपचा प्रोटोकॉल सचिव संतोष दयाशंकर पांडे (Adv. Santosh Dayashankar Pandey) व शमशुद्दीन इस्लाम शेख (Shamshuddin Islam Shaikh) हे किरण सिंह (Kiran Singh) यांच्याकडे प्रपोजल घेऊन आले. त्यावेळी मदतीसाठी त्यांनी भाजपचे नेते, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांची भेट घ्यायची ठरवले. त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२५ रोजी आशिष शेलार यांच्याबरोबर मिटिंग झाली. सांताक्रूझ येथे झालेल्या या बैठकीत पांडे, सीमा सिंह, शमशुद्दीन व किरण सिंह उपस्थित होते.

या बैठकीत ठरल्यानुसार १०० गुंठा जमीन विकत घ्यायची ठरले, यापैकी उर्वरित साडेपंधरा एकर जमिनीची किंमत ही सीमा सिंह देणार आहेत, असे ठरविण्यात आले. त्यानुसार किरण सिंह, शमशुद्दीन, मैत्रेय पटेल व प्रकाश दबंगे यांनी १०० गुंठा जमीनचे खरेदी खत केले. त्यापैकी ५० गुंठा जमीन ही संतोष दयाशंकर पांडे या भामट्याच्या नावावर केली. त्याची किंमत म्हणजेच ३ कोटी ५५ लाख रक्कम ही नीतीराज डी. सिंह व देवेंद्र मेघजी देवडा यांनी त्यांच्या बँक खात्यामधून RTGS द्वारे मालकाला पाठवली.

१०० गुंठा जमिनीपैकी उर्वरित ५० गुंठा जमिनीचे ३ कोटी ५५ लाख रुपये हे मैत्रेय मितेश पटेल, प्रकाश दबंगे या दोघांच्या बँक खात्यातून जमीन मालकांना देण्यात आले. या सातबाऱ्यावर संतोष पांडे, मैत्रेय पटेल, प्रकाश दबंगे यांच्या नावाने रजिस्ट्रेशन करण्यात आले. या घटनेला दोन महिने उलटून गेले, मात्र संतोष पांडे याने अद्याप फुटकी कवडीही दिलेली नाही, इतकेच नव्हे तर या भुरट्या पांडेने १० मार्च २०२५ नंतर या सर्वांचे फोन उचलणेही बंद केले.

त्यानंतर एकदा किरण सिंह व शमशुद्दीन यांना पांडे याने पनवेल येथील साई हॉटेलजवळ बोलावले. त्यांना स्वतःच्या गाडीत बसवले व तेथे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर भामट्या पांडे याने मितेश पटेल यांना फोन करून जमिनीचा सौदा करण्यास सांगितले. त्यानुसार पटेल यांनी Stone Age India Pvt. Ltd तर्फे देव एच लहेरू यांच्या नावाने जमिनीचा सौदा केला आणि २५ लाख रुपये टोकन मनी (token money) घेतले. त्यानंतर या पांडेने अद्याप अग्रीमेंट केलेले नाही व त्यांचा अद्याप फोनही उचलला नाही. याप्रकरणी लवकरच भामट्या पांडे विरोधात तक्रारी करण्यात येणार आहेत, तसे झाल्यास इतर बडे मासेही सरकारच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

• कोण आहे भामटा संतोष पांडे?

भारतातील भाजपचे असंख्य बडे नेते हे मुंबईत येत असतात. या सर्व पाहुण्यांना एअरपोर्टवरून रिसिव्ह करणे, त्यांची शाही बडदास्त ठेवणे, यासाठी मुंबई भाजपच्या वतीने तत्कालीन मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी राजशिष्टाचार विभागाच्या (protocol department) नियुक्त्या केल्या. यात संतोष पांडे (Santosh Pandey) या भामट्यालाही मुंबई विभाग प्रमुखपदी (Mumbai Division Head) नेमले.

पांडे नावाचा हा भामटा लहानपणी चाळीत रहायचा. त्यानंतर तो भाजपचा कार्यकर्ता झाला. तेव्हापासून तो भाजपच्या नावावर लोकांना फसवित असे. प्रोटोकॉल सेक्रेटरी हे पद हे पद आल्यापासून त्याने आणखी मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यास सुरुवात केली. त्यासंबंधीच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे येत असतात, मात्र वरिष्ठांनी त्याला कायमच पाठीशी घातले होते.

भाजपचे वरिष्ठ नेते आशिष शेलार यांच्या मर्जीतील हा माणूस आहे. त्यामुळेच त्यांची या पदावर वर्णी लागली, अशी सूत्रांची माहिती आहे. शेलार यांच्या नावावर पांडे अनेकदा वसुलीही करतो. त्याच्या नावावर यापूर्वीही अनेकदा पोलीस स्टेशनमध्ये ‘एफआयआर’ही झालेले आहेत. मात्र भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याच स्वरूपाची कारवाई होत नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

अधिक वाचा : मुंबई प्रोटोकॉल सेक्रेटरीची ४२० गिरी

• ‘Advocate’ पदवी बनावट असल्याचा संशय

पांडे याच्यावर यापूर्वीही विक्रोळी पोलीस स्थानकात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीला पोलीस ‘एफआयआर’ घेण्यास तयार नव्हते. मात्र तक्रारदार न्यायालयात गेले. त्यानंतर अखेरीस न्यायालयाने पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदविण्याचा आदेश दिला. हे प्रकरण ‘स्प्राऊट्स न्यूज’ व त्याचे वरिष्ठ संपादक उन्मेष गुजराथी (Unmesh Gujarathi ) यांनी लावून धरले. आरोपी संतोष दयाशंकर पांडे याचा खरा चेहरा उघडकीस आणला. त्यामुळे त्याचा चेहरा काळा ठिक्कर पडला. यातूनच स्वतःची इमेज ब्रॅण्डिंग करण्यासाठी त्याने नवा फंडा रचला.

‘स्प्राऊट्स न्यूज’च्या विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडे हा दहावी नापास आहेत, मात्र त्याने अचानक मागील वर्षापासून त्याने स्वतःच्या नावापुढे ऍडव्होकेट (advocate) ही पदवी लावण्यास सुरुवात केली, ही पदवी बोगस आहे की, त्याने नियमबाह्य पद्धतीने विकत घेतलेली आहे, याची सखोल चौकशी व्हायला हवी. यासंबंधीची तक्रार स्प्राऊट्स न्यूजच्या टीमतर्फे करण्यात करण्यात येणार आहे.

• वरिष्ठांना भामटा संतोष पांडेच का आठवतो?

पांडे हा फ्रॉड, भामटा आहे, त्याच्यावर असंख्य गंभीर गुन्हे दाखल आहेत, तरीही त्याची भाजपच्या प्रोटोकॉल सचिव पदी वर्णी लागलेली आहे. अनेकदा तो वरिष्ठांबरोबर फोटोत असतो,याचे महत्त्वाचे कारण आहे. हा भामटा वरिष्ठांना कायमच ‘गिफ्ट’ देत असतो, मात्र हे गिफ्ट अनैतिक व ‘रंगेल’ स्वरूपाचे असते,

काही महिलांच्या तक्रारीही आल्या असल्याची सूत्रांची खात्रीलायक व गोपनीय माहिती आहे.

• पांडेची ४२० गिरी, सत्तेच्या नावावर फसवणूक

संतोष पांडे याच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी समोर आल्या आहेत. स्प्राऊट्सच्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमला (SIT) मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमधील पदाचा गैरवापर करून पांडेने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला.आहे, अशीही सूत्रांची माहिती आहे.

• नोकरीचे आमिष आणि बनावट कागदपत्रे

विक्रोळीतील आकाश गागट यांचीही पांडे यांनी फसवणूक केली आहे. गागट यांना रेल्वे मध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले व त्यांच्याकडून या भामट्या पांडेने तब्बल 36 लाखांहून अधिक रक्कम उकळली. त्यानंतर त्यांना रेल्वेचे बनावट नियुक्तीपत्र दिले. त्याच्यावर बोगस शिक्के मारले व अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्याही स्वतःच या भामट्यानेच केल्या, अशी माहितीही ‘एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आलेली आहे.

• न्यायालयाच्या आदेशानंतर FIR

पोलिसांनी सुरुवातीला गागट यांची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी संतोष पांडे व इतर 12 आरोपींवर IPC 420, 465, 468, 471, 34 अंतर्गत गुन्हे दाखल केले. सूत्रांनुसार, राजकीय दबावामुळे तपासावर मर्यादा येत असल्याचेही समोर येत आहे.

• हकालपट्टीची जोरदार मागणी

पांडेच्या या काळ्या कृत्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे त्याची तात्काळ हकालपट्टी आणि त्याच्या संपूर्ण टोळीची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पीडितांसह असंख्य भाजप कार्यकर्त्यांकडूनही होत आहे.

• सार्वजनिक इशारा | नागरिकांना आवाहन

संतोष दयाशंकर पांडे यांच्यासारख्या भामट्यांची माहिती असल्यास किंवा अशा व्यक्तींचा सामना झाल्यास, कोणताही विलंब न करता तात्काळ आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा. सजग नागरिकांनी दिलेली माहिती पुढील फसवणूक रोखण्यास मदत करते.

आपली तक्रार दुर्लक्षित होत असल्याचे वाटत असल्यास किंवा प्रकरणाला सखोल तपासाची आवश्यकता असल्यास, तपास पत्रकार उन्मेष गुजराथी आणि स्प्राऊट्स न्यूज टीमशी संपर्क साधा. जनहितासाठी सत्य उघड करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.

Related posts
ExclusiveNews PointPure Politics

BJP 420 Giri Allegations : मुंबई प्रोटोकॉल सेक्रेटरीची ४२० गिरी

1 Mins read
उन्मेष गुजराथी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांच्या अत्यंत जवळचा व विश्वासू सहकारी व मुंबई भाजपचा प्रोटोकॉल सेक्रेटरी…
ExclusivePure PoliticsTrending News

Food Scam : मुंबईत ३ कोटींचा अन्न घोटाळा, माजी नगरसेवकावर आरोप

1 Mins read
मुंबईत कोविड लॉकडाऊनच्या काळात, गरजू नागरिकांना अन्न पुरवठा करण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार समाजसेविका पायल शहा यांनी दाखल केली आहे….
ExclusiveNews PointTrending News

SRA : सायनमधील एसआरए प्रकल्पात १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

1 Mins read
उन्मेष गुजराथी Sprouts News Exclusive • भाजप नगरसेविकेच्या पतीसह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार सायन येथील सायन–आकार एसआरए को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (भंडारवाडा) या झोपडपट्टी पुनर्वसन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *